मनोहर सागर धरणावर पर्यटकांची गर्दी सोशल डिस्टेंस चा होत आहे उल्लंघन

 

गोंदिया जिल्हात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मनोहर सागर धरणात पाणी भरल्यामुळे शिरपूर धरणाचे सात दरवाजे खुले असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. महिला, पुरुष, व लहान मुले घेऊन पर्यटक येत आहेत.

राज्यामध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत आहे. परंतु पाहायला येणारे महिला व पुरुष सोशल डिस्टेंस व मास्क चा व सॅनिटाइजर चा उपयोग नाही होत आहे. शासकीय नियमांचा उल्लंघन होत आहे. मनोहर सागर बांधा वरुन पाणी खाली पडत असल्यामुळे पर्यटक खाली असलेल्या उभ्या भिंतीवर चडत आहेत. परंतु ह्या गोष्टीपासून कधीही दुर्घटना होऊ शकते. हजारोच्या संख्येत पर्यटकांची गर्दी होत आहे. तरी पण सुरक्षा करीता पुलिस उपलब्ध नाही आहेत. शिरपूर बांधावर खतरा होण्याची शक्यता दिसून येते आहे. धरणाचे (७) सात दरवाजे २-२ फुटाणे उघडण्यात आले आहेत. परंतु पाणी बंद झाल्यावर दरवाजे बंद करण्यात येतील अशी माहिती दिली आहे..

Leave a Comment