मराठा पाटील युवक समितीची गौलखेड येथे 82 वी शाखा स्थापन थाटात उद्घाटन सोहळा संपन्न

 

विठ्ठल  अवताडे  शेगाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर गौलखेड येथे मराठा पाटील युवक समितीची शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन दादा ढगे ,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हभप श्री शिवदास महाराज भारब्दे , ह्यांच्या हातून पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप श्री शिवदास महाराज भारब्दे होते तर यावेळी प्रस्तावना विठ्ठल अवताडे यांनी केली.

त्या नंतर युवकसमितीचे कार्य आणि युवकांना मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन समितीच्या कार्याचे कौतुक केले तर आभार अविनाश शेजोळे यांनी मानले.

यावेळी हभप सोपान महाराज शेजोळे यांच्या सह खामगांव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या सह समितीचे विशेष आमंत्रित भूषण दाभाडे ज्ञानेश्वर तकोते जिल्हा अध्यक्ष छोटू पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष सतिश लांजुळकार , जिल्हा सचिव मोहन घुईकर ,जिल्हा संघटक अविनाश कुटे, शंकर कोळस्कार , जिल्हा प्रवक्ते विठ्ठल अवताडे , नांदुरा शहर कार्याध्यक्ष वैभव पाटील, खामगाव तालुका उपाध्यक्ष राम पारसकर शेगाव तालुका अध्यक्ष श्याम अढाव ,तालुका उपाध्यक्ष अविनाश शेजोळे तालुका सचिव दत्ता खोंड तालुका संघटक अमोल हिंगने मुख्य संघटक योगेश पिसे भोटा शाखा अध्यक्ष वैभव पारस्कार यांच्या सह समस्त गावकरी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या वेळी गौलखेड शाखा अध्यक्ष अतुल शेजोले ,विठ्ठल शेजोळे शाखा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे शाखा सचिव तर राम प्रभू शेजोळे,ऋषभ शेजोळे ,गणेश शेजोळे, युवराज शेजोळे राम शेजोळे धनंजय शेजोळे संतोष गावंडे ,सचिन शेजोळे यांची शाखा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली

Leave a Comment