नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदुरा येथील पत्रकारांनी निषेध नोंदवून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करावी, या मागणीसाठी नांदुरा येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ रोजी सायंकाळी ७:३०वाजेच्या सुमारास आपले वृत्तपत्रांचे कार्यालय बंद करून दूध घेण्याकरिता रूपाली दूध डेअरी कडे जात असताना माता महाकाली येथील मोहन महादेव लटके हा दारुच्या नशेत येवून त्याने तुमच्या वृत्तपत्रांत माझ्या वडिलांच्या चांगल्या बातम्या लावा असे म्हटले त्यावर नगरपालिका निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे म्हणून त्याला समजावून सांगितले परंतु त्याने काही एक न ऐकता अश्लील शिवीगाळ करून फोन करून दहा ते पंधरा इतर मंडळी जमवून विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला.सदरचा हल्ला हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांवर हल्ला आहे हे वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नांदुरा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे, निवेदनावर किशोर इंगळे विदर्भ प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना, तालुका अध्यक्ष अमर पाटील, दिनेश ब्राह्मणे, विजयानंद तायडे, पुरुषोत्तम भातुरकर, संतोष तायडे, राहुल खडेराव, निंबाजी बाजोडे, प्रफुल्ल बिचारे, विठ्ठल भातुरकर, देवेंद्र जैस्वाल , नजीर रजवी आदींच्या सह्या आहेत.