सचिन वाघे प्रतिनिधी
हिंगणघाट :-मल्हारी पेट्रोल पंप (नंदोरी चौक) येथे 106.55 रुपये प्रति लिटर तर पावर पेट्रोल112.92 रुपये प्रति लिटर या भावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु अनेकदा या ठिकाणी 106 . 55 रुपये प्रति लिटर पेट्रोल संपले सांगण्यात येते त्याऐवजी 112 .92 रुपये प्रति लिटर पावर पेट्रोल विकण्यात येते . याची कल्पना ग्राहकांना नसते. पेट्रोल पंपवर पावर पेट्रोल उपलब्ध आहे याबद्दल या ठिकाणी कोणतीही माहिती असलेला सूचना फलक लावण्यात आलेला नाही . एक प्रकारे पेट्रोल ग्राहकाची पेट्रोल पंप मालकाकडून फसवणूक होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.