Home Breaking News महसूल राज्य मंत्री मा ना अब्दुलजी सत्तार साहेब यांचा वैजापुर परिसरात अतिवृष्टी...

महसूल राज्य मंत्री मा ना अब्दुलजी सत्तार साहेब यांचा वैजापुर परिसरात अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी दौरा व “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी..” या मोहीम अंतर्गत आढावा बैठक

419
0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ”माझे कुटुंब.. माझी जबाबदारी..” ही मोहीम संपुर्ण राज्यात कोरोनाची महामारी नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रभावीपणे राबविण्यात येत असुन, महसुल व ग्रामविकास मंत्री मा ना अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यामोहिमे अंतर्गत आजपर्यंत वैजापुर शहरातील 50 टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास मृत्यु दर हा राज्यात सर्वात कमी असुन रुग्ण बरे व्हायचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार_प्रा रमेश पा.बोरनारे सर यांनी केले.
.
.
तसेच वैजापुर-गंगापूर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टी पावसामुळे भगुर, मांजरी या शिवारात थेट शेतकर्यांच्या शेतात जाऊन झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली.
.
तसेच या प्रसंगी खासदार इम्तियाज जलिल साहेब, आमदार उदयभाऊ राजपूत, मा. आ. भाऊसाहेब चिकटगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण साहेब, जिल्हा कृषी अधिक्षक मोटे साहेब, उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख साहेब, तहसीलदार धुळंदर साहेब, पोलिस निरीक्षक कुलकर्णी साहेब, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, उपनगराध्य साबेरभाई, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, मा नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, लक्ष्मण सांगळे, सभापती सौ. सिनाताई मनाजी पा मिसाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ तारपे साहेब, डॉ इंदुरकर, सभापती भगीनाथ मगर, तालुका प्रमुख सचिन वाणी, सुभाष कानडे, जि.प.सदस्य रामहरी बापू जाधव, अंकुश पा सुंब, अकिल शेठ, राजेंद्र मगर, प्रकाश शेळके, रविंद्र कसबे, इम्रान कुरैशी, अमीर अली अमोल बुट्टे व सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी, नागरीक उपस्थीत होते.

Previous articleगावातील गाजर गवत निर्मुलनासाठी अमोल ठाकरे यांनी केली तननाशक फवारणी
Next articleअत्याचार करणारांनो महिला शक्ती तुम्हाला माफ करणार नाही -ऊर्मिलाताईं ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here