यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी आयपीएस पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या साकळीच्या एका संशयित विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. हि आक्षेपार्ह पोस्ट व्हाटसअप या सोशल मिडिया माध्यमातून व्हायरल केल्यामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा प्रवृत्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , उपशहर प्रमुख संतोष धोबी, युवा सेना शहराधिकारी सागर देवांग, शिवसेना आदिवासी आघाडी तालुका प्रमुख हुसेन तडवी, अजहर खाटिक, सारंग बेहेरे, सुनील जोशी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, महेंद्र चौधरी आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान यावल पोलीसांनी अशा प्रकारची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले आहे .