यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या तालुका संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजने ऐवजी शासनाने शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन लागु करावी या मागणीसाठी शासनाने लक्ष वेधण्यासाठी मोटरसायकल रॅल्ली काढुन मागण्यांचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले .
आपल्या दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन म्हटले आहे की , राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागु नाही त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर शासकीय कर्मचारी हा आयुष्याच्या उतार वयात दवाखाना खर्च , कौटुंबीक कार्यक्रम उदारणार्थ , मुलांचे शिक्षण , लग्न ईत्यादी कौटुंबीक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात सेवानिवृत्ती नंतर काहीच रक्कम उपलब्ध होत नसल्याने चरीतार्थ चालविणे देखील कठीन होत . त्यामुळे देशातील काही राज्याप्रमाणे शासनाने आपल्या राज्यात देखील जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी संघटनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्यभरात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठीकठीकाणी मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आले होते त्याच प्रमाणे यावल तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पी. व्ही. तळेले, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष बी.के .पारधी यांच्या नेतृत्वाखाली यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया पासुन पंचायत समिती व तहसील कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली यात ग्रामसेवक संघटनेचे हितु महाजन ,राजु तडवी, शिवाजी सोनवणे , भोयराज फालक , आर .टी. बाविस्कर , सुबोध सोये , दिपक तायडे , पी .आर . चव्हाण, गुरुदास चौधरी , बाळु वायकोळे, उदय पाटील , आर . यु . कोठोके , के .जी . पाटील , व्ही .एल . पाटील , प्रविण चौधरी आदी ग्रामसेवकांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी तहसील कार्यालयात नायब तहसीदार आर डी पाटील , यावल पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी यांनी मागण्यांची निवेदन देण्यात आली .