Home Breaking News महावितरणा च्या भोंगळ कारभारामुळे आदिवासींची दिवाळी प्रकाशित होणार की नाही….?

महावितरणा च्या भोंगळ कारभारामुळे आदिवासींची दिवाळी प्रकाशित होणार की नाही….?

404
0

 

 

सोनाळा (सूर्या मराठी न्युज) संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसित आदिवासीबहुल भागांमधील गावांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंधारमय असलेले लोक वस्ती प्रकाशित करण्याकरता महावितरणने मोठा गाजा वाजा करत रोहन खिडकी, नविन चुनखडी, शेंबा इत्यादी गावांमध्ये लाखो रुपये खर्चून विद्युत महावितरणने मोठ्या थाटात कामाला सुरुवात केली. पंधरा दिवसात काम पूर्ण करून गेल्या एक ते दीड महिन्यापासून महावितरणचे अधिकारी लाईट चालू करण्याकरता कशाची वाट बघत आहेत. महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुंभकरण झोपेतून उठून आदिवासीबहुल भागातील लाईन चालू करावी अशी मागणी आदिवासी भागातील नागरिक करत आहे.
आदिवासीबहुल भागातील पुनर्वसित आदिवासी नागरिकांनी विद्युत महावितरणला आपण लाईन चालू करत नसाल तर आदिवासी बांधव विद्युत महावितरण कार्यालय सोनाळा या ठिकाणी तीव्र आंदोलन करतील हे त्यांनी आपल्या सूर्या मराठी न्यूज चॅनल च्या माध्यमातून शासनापुढे मांडले.

Previous articleवान चे पाणी आमच्या हक्काचे घोषणा देत तेल्हारा आडसुळ येथे भाजपाचे रास्तारोको
Next articleचुन भाकर आंदोलनाने तहसिल कार्यालय दणाणले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here