महेलखेडी गावातील येथे मानसिक तणावाखाली एका तरूणाने विहिरीत उडी घेत पाण्यात बुडून केली आत्महत्या

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील महेलखेडी येथील रहीवासी एका तरुणाने मानसिक तणावाखाली येत विहीरीत उडी घेत आत्महत्या करीत आपली जिवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना समोर आली असून यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की तालुका यावल येथील रहीम बिस्मिल्ला देशमुख वय २४ वर्ष या तरूणाने दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी महेलखेडी कोरपावली शिवारातील विलास भागवत पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे . रहीम देशमुख हा तरूण काल सायंकाळच्या ५ वाजेपासुन घराबाहेर निघाला होता तो रात्री घरी न आल्याने कुटुंबातील मंडळींनी गावातील वनांतेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळुन आला नाही दिनांक १ नोव्हेबर रोजी पुन्हा महेलखेडी गावच्या गावठाण शिवारात त्याचे नातेवाईक शोध घेत असतांना विलास पाटील यांच्या शेतातील विहीरी जवळ त्याची चप्पल दिसुन आली म्हणुन शोध घेणाऱ्यानी विहीरीत डोकावुन पाहीले असता विहीरीच्या पाण्यात त्याचा मृतदेह दिसुन आला . रहीम देशमुख याचा सहा महीन्यापुर्वीच लग्न झाले होते लग्नाच्या तिन महीन्या नंतरच त्याची फारकत झाल्याने विवाहीत जिवन पत्नीच्या घटस्फोटाने संपुष्टात आल्याने तो मागील काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली होता असे बोलले जात आहे . या बाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचे काका अब्दुल फतु देशमुख वय ४१ वर्ष यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . मयत रहीम देशमुख यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी केलेत.

Leave a Comment