आयुषी दुबे शेगाव
12 जानेवारी शेगाव जायन्टस सहेली ग्रुप व लायनेस क्लब च्या संयुक्त विद्यमाने माँ जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन निमित्त महिलांची विरांगणा संस्कार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश माँ जिजाऊ चे संस्कार युवा पिढीवर रूजवणे व युवतींना विरांगणा असल्याची जाणीव करून देणे अश्या आशयाचा होता. या रॅलीमध्ये एकूण 50 सायकल स्वर विद्यार्थिनी व शेगाव शहरातील सर्व महिला सहभागी झाल्या होत्या.
सायकल रॅलीचे उद्घाटन शेगावच्या प्रथम महिला नागरिक नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच यांनी माँ जिजाऊ व विवेकानंदाचे पूजन, हारार्पण, दीपप्रज्वलन करून व हिरवी झेंडी दाखवून जिजामाता चौकातून सुरुवात केली व मथुरा लॉन्स वर ही समाप्त झाली.यावेळी कल्पना मसने,राजकुमारी भट्टड,अंजूषा भूतडा किशोर मिश्रा,विनायक भारंबे हे विशेष रूपाने उपस्थित होते.यावेळी अश्वारूढ जिजामाता च्या वेशभूषेत आलेल्या लावण्या असंबे यांनी मशाल पेटवून युवतींना संदेश दिला.
ही रॅली संपूर्ण शेगावातून मेन रोडने मथुरा लॉन्स येथे समाप्त झाली. तेथे विद्यार्थिनींना लायनेस क्लबच्या वतीने व स्नॅक्स व पाणी वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे बिस्किट वाटपही करण्यात आले. कार्यक्रमा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी सामूहिक नृत्य सादर करून शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
यावेळी
स्वामी विवेकानंद ,राजमाता जिजाबाई, बाल शिवाजी या वेशभूषां मध्ये तयार होऊन आलेले बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यामध्ये सान्वी इधोळ, साक्षी कदम, गायत्री देशमुख, हर्ष वासनिक, ऋतुराज मसने यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींना सामुहिक नृत्यासाठी पुस्तक बक्षिस म्हणून देऊन प्रोत्साहित केले. मुख्याध्यापिका सौ जयश्री इधोळ मॅडम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करणाऱ्या लावण्या असंबे यांनाही विशेष रूपाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राधिका देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणा लाखे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी वृषाली ताई भारंबे, लावण्या अंसबे,रजनी शर्मा व लायनेस ग्रुप जायन्टस गृप पतंजली च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.