माजी सैनिक अर्जुन गवई ने दिला मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात !शिवाय दोन भावंडांचा उचलणार शैक्षणिक खर्च –

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

हराळ तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील करण रामदास महाजन हा गरीब होतकरू विद्यार्थी साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता परंतु जागतिक महामारी असलेल्या कोरोना संकटाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे हा विद्यार्थी त्याच्या मूळ हराळ गावी घरीच होता ‘करंन आर्थिक परिस्थिती हलाखीची होती ।अगोदरच कर यांचे वडील काकाचे निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीत्यांची विधवा आई श्रीमती लक्ष्मीबाई रामदास महाजन वश्रीमती जिजाबाई लक्ष्मण महाजन यांच्यावर येऊन पडली !त्यातच करंन चा17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी अल्पशा आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आणखीनच भार त्याच्या आईवर पडला ‘भावी आधार हातातून निसटून गेला !करण हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता ।ही माहिती माजी सैनिक पता अनिकेत सैनिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक अर्जुन गवई यांना कळताच त्यांनी महाजन कुटुंब यांना संविधान दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमांमध्ये 26नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा येते माणुसकीचा धर्म जोपासून अनिकेत अर्जुन गवई व विमलताई हिवाळे यांच्या हस्ते महाजन कुटुंबियांना पाच हजार रुपये रोख मदत दिली ।यावेळी अध्यक्ष अर्जुन भाऊ गवई ‘देवानंद शिंदे मुख्याध्यापक प्रदीप जाधव डोंगर दिवे सर अंभोरे सर दैनिक देशोन्नती चे पत्रकार मनोज पऱ्हाड ‘आदी यावेळी उपस्थित होते !शिवाय करन ची आईश्रीमती लक्ष्मी महाजन । काकू .जिजाबाई महाजन मामा दिगंबर वाणीयांच्या हातात मदतीची रक्कम सुपूर्द करण्यात आली !अर्जुन गवई यांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे !

Leave a Comment