Home Breaking News माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार,...

माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.

625
0

 

 

अमरावती : अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही घरीच असल्याचं समोर आलं आहे. चिठ्ठीत पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख आहे.

माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.

तक्रारीत म्हटलं आहे की, “पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख पतीने चिठ्ठीत केला आहे. माझ्या पतीने जर आत्महत्या केली तर याला ठाणेदार सचिन परदेशी, बिट जमादार तायडे यांना जबाबदार धरुन खुनाचा गुन्हा दाखल करावा.” याशिवाय चांदूरबाजार येथील तहसीलदार धीरज थुल, राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांचे खाजगी सचिव दीपक भोंगाडे यांच्या नावाचा उल्लेखही तक्रारी करण्यात आला आहे.

दरम्यान शिरजगाव कसबा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन पथकं तातडीने शोधमोहीमेसाठी पाठवण्यात आली आहेत.

Previous articleहोय ही बातमी खरी आहे “ती”, च्यापासून मला दोन लेकरं
Next articleबुद्ध विहार व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सवडद येथील युवकांनी केलेले श्रमदान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here