माटरगाव येथील पालकावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ माटरगाव कडकडीत बंद

 

पालकावरील गुन्हे मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांचा शाळा बंदचा इशारा व पालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शेगाव प्रतिनिधी अर्जून कराळे

शेगाव- माटरगाव येथील विद्यार्थी व पालकांनी २ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषद बुलढाणा येथे शाळेला शिक्षक व इतर समस्या बाबत बुलढाणा येथे co मॅडमच्या दालनात न्याय मागण्याकरिता गेल्या असता काही पालकावर गुन्हे दाखल करण्यात आले.याच्या निषेधार्थ आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी माटरगाव येथे कळकळीत बंद ठेवण्यात आला.

व पालकावरील गुन्हे मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांनी शाळा बंदचा इशारा देऊन गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सात ते आठ शिक्षकांचे कमी असल्याकारणाने व शाळेतील अनेक समस्यांच्या बाबत येथील शाळा समिती यांनी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथे दोन-तीन वेळा निवेदन देऊन सुद्धा अद्यापही त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही.

त्यामुळे दिनांक २ ऑगस्ट रोजी येथील पालक व विद्यार्थी बुलढाणा येथे जिल्हा परिषद कार्यालय co मॅडमच्या दालनात यांनी शाळा भरवली तिथेच राष्ट्रगान केले व आपल्या समस्या मांडण्याकरिता co मॅडमच्या प्रतीक्षेत तीन तास वाट पाहात बसावे लागले त्यातच एका मुलीला भोंड आल्याने ती बेशुद्ध पडली व पालकांची धावपळ झाल्याने त्यांनी हवेचे ठिकाण म्हणून वरच्या रूम मध्ये पंख्याच्या हवे खाली त्या मुलीला नेण्यात आले.

काही काळाने सीओ मॅडम त्यांना भेटायला आले असता त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तुम्हाला शिक्षक देऊ व शाळेच्याही समस्या दूर करू असे आश्वासन दिले व नंतर विद्यार्थी व पालक आपल्या गावी परत आले परंतु दुसऱ्या दिवशी त्यामधील अकरा पालकावर गंभीर स्वरूपाचे शासकीय कामात अडथळा आणल्या बाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे चुकीचे असून या गुन्ह्याच्या निषेधार्थ माटरगाव येथील पालकांनी व गावकऱ्यांनी आज माटरगावत कडकडीत बंद पाडला व गुन्हे दाखल करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला.

यावेळी गावातील सर्व पक्षीय लोकांनी सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध केला सदर विद्यार्थी व पालकांनी माध्यमांशी बोलताना आमच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आम्ही न्याय मागण्याकरिता गेलो असता उलट आमच्यावरच गुन्हे दाखल झाले चोरांच्या उलट्या बोंबा हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याचे येथील पालक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

एका प्रकारे लोकशाहीची गडचिप्पी होताना दिसत आहे लोकशाही मार्गाने रीतसर निवेदन दिले. तरी सुध्दा भारतीय दंड विधान भादवी 153,143,149,66, 192 सारखे गंभीर गुन्हे पालकांवर लावण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांनी केला असा ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे.
ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही बसण्याकरिता पुरेसे डेक्स बॅच नाहीत पावसाळ्यात शाळा गळते शाळेला कंपाउंड नाही मुलींना मुताऱ्या नाहीत अशा अनेक समस्यांच्या जाळ्यात अडकलेली ही शाळा याबद्दल मुलींनी प्रतिक्रिया दिल्या की आम्ही फक्त खिचडी खाऊन भिकारी बनण्यापेक्षा चांगले शिक्षक देऊन अधिकारी बनवा अशा केविलवाण्या स्वरूपात येथील शाळेतील विद्यार्थिनींनी प्रतिक्रिया दिल्या. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या आणि पालकावर झालेले गुन्हे हे मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पालकांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा पालकावर खोट्या स्वरूपात दाखल केलेले गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बोलताना विद्यार्थी व गावकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Comment