Home Breaking News मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.

881
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सुपुत्र प्रदीप मांदळे दि . १४डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यातील द्रास टायगर हिल येथे शहिद झालेअंगावरती बर्फाचा मोठा गोळा पडल्यामुळे ते ड्युटीवर असताना शहीद झाले ! बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र वीर जवान शहीद प्रदीप साहेबराव मांदळे पळसखेड चक्का या गावातील गरीब कुटुंबामधील हा तरुण व्यक्ती दोन हजार आठ ते नऊ यास साली फौजी सैन्यदलामध्ये औरंगाबाद या ठिकाणी भरती झाला होता.

शहीद झाल्याचे ठिकाण द्रास टायगर हिल जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत ड्युटीवर होता त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती पत्नीच नाव कांचन प्रदीप मांदळे, प्रदीप च लग्न २०१४ साली झालेलं होतं.
तीन मुलं असून त्यांचे समोर नाव. सुरज ,सार्थक ,जयदीप असे मुलांचे नाव असून आईचे नाव श्रीमती. शिवनंदा साहेबराव मांदळे .भावांचे नाव संदीप साहेबराव मांदळे कृषी सहाय्यक विशाल साहेबराव मान्दळे फौजी सैन्यदलामध्ये सध्या कार्यरत आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद.
पश्चिम बंगाल या मधील पन्हागड या ठिकाणी कार्यरत आहे २००८ च्या अगोदर ची परिस्थिती फार गरीब कुटुंबातील ही व्यक्ती असून आई वडील मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करून तिन्ही मुलं चांगल्या

ठिकाणी नोकरी लावणारे शेवटी स्वर्गीय साहेबराव मांदळे यांना सर्व कुटुंबाला सोडून जावे लागले काही आजारामुळे त्यांची मृत्यु दिनांक २०१७ साली झालेला आहे त्यामुळे मोठा मुलगा म्हणून प्रदीप यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती.
त्यामुळे घरात घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मांदळे परिवार खूप दुःखाचा डोंगर सावट याठिकाणी आहे आणि पळसखेड चक्का या गावांमध्ये अशी घटना पहिल्यांदा घडल्यामुळे या गावांमध्ये खूप दुःख होत आहे.
संदीप साहेबराव मांदळे यांना रात्री नऊच्या दरम्यान मध्ये माहिती मिळाली सैन्य दला कडून फोनवरून माहिती मिळाली तुझा भाऊ शहीद झालेला असल्याची माहिती फोनवर देण्यात आली.

त्यांचा पार्थिव अंत्यविधीसाठी दिनांक १८तारखेला येईल अशी प्राथमिक माहिती आहे !

Previous articleBIG BREKING 1 कोटीच्या विमा साठी बायकोने नवऱ्याला संपवले
Next articleवरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला नागपूर मेट्रोतून प्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here