Home बुलढाणा मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा...

मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा

421
0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सुनगाव येथे विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती यांच्याद्वारे कार्यरत असलेल्या मातोश्री नाथीयाबाई विद्यालय सूनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे कॉलेज क्विंन यशस्वी वकील राजकारणी राजस्थानच्या राज्यपाल व देशाच्या राष्ट्रपती अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळत प्रतिभाताईंनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा हे भारतीय राजकारणावर 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी राज्यसभेच्या सदस्य म्हणून काम पाहिलं 2004 मध्ये त्यांची राजस्थानच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली व 25 जुलै 2007 मध्ये त्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या असा त्यांचा राजकीय प्रवास आहे त्यातच आज त्यांचा 84 वा वाढदिवस सुनगाव येथील मातोश्री नाथीयाबाई विद्यालय येथे मुलांना फळे वाटून साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय इंगळे सर यांनी ताईंचा राजकीय प्रवास याबद्दल माहिती दिली यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री कोकाटे सर पत्रकार अनिल भगत पत्रकार शिवदास सोनवणे पत्रकार गजानन सोनटक्के व शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते

Previous articleलक्ष्य करिअर अकॅडमी तर्फे उद्या दीडशे विद्यार्थी देणार शहीद प्रदीप मांदळे यांना मानवंदना 
Next articleमहाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज टीमकडून कर्तव्यदक्ष पाेलिसांचा सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here