मा.श्री.अशोक(आण्णा)पांगारकर विनम्र,अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

 

Jalna (तुकाराम राठोड,जालना)

जालना-सर्वांचे लाडके अशोक(आण्णा)पांगारकर भारतीय जनता पक्षाचे ओ.बी.सी.सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,जालना नगर परिषदेतील गटनेते,भाग्य नगर वॉर्डाचे नगरसेवक! भारतीय जनता पार्टीचे उदयोन्मुख लोकाभिमुख नेतृत्व.विविध सामाजिक व राजकीय पदावर काम करणारे अशोक आण्णा आज सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.भारदस्त उंची देहयष्टी,सदा हसतमुख चेहरा,बोलण्यातील गोडवा व वागण्यातील साधेपणा यामुळे पहिल्याच भेटीत प्रत्येकाला आण्णा आपलंसं करून घेतात.

कमी वयात एवढ्या उंचीवर जाऊनही त्यांच्यातील विनम्रता कुठेही कमी झालेली नाही.वॉर्डाच्या,शहराच्या समस्यांची बारकाईने माहिती घेणे व ते प्रश्न सोडविण्यासाठी लगेच प्रतिसाद देणं हि आण्णांची खासियत आहे.विकासाची ब्लू प्रिंट तयार ठेऊन त्यावर अमल करणारा हा तरुण नेता आज प्रगतीचे एक एक शिखर काबीज करत आहे।राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेल्या दिग्गज लोकांसोबत काम करणं;त्यांच्या पसंतीस उतरणं आणि त्यातून लोकांची विधायक कामे करणे ही सोपी गोष्ट नाही.यासोबतच सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांसोबत असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध हि आण्णांची खासियत आहे.एका वैभवशाली आणि समृद्ध परिवाराचा वारसा पुढे नेटाने आणि डौलाने चालविणारे आण्णा आपल्या कुटुंबाचं भूषण आहे.उद्योग व्यवसायात असलेली त्यांची दूरदृष्टी आज त्यांनी जे उद्योग उभे केले आहेत,त्यावरून दिसून येते.

अनेक तरुण आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलद्ध करून दिले आहेत.वृक्षारोपण,रोपवाटप,फळवाटप,गरजूना अन्नवाटप,रक्तदान शिबिराचे आयोजन,समाज मेळावा असे अनेक लक्षवेधी काम आण्णांच्या हातून झाले आहे.सध्या ते करत असलेले सर्वात मोठे काम म्हणजे मुक्तेश्वर तलाव व मंदिर परिसर सुशोभीकरण ! आज जालना शहराच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प पहिला की मन खूप प्रसन्न होते.संपूर्ण जालना शहराचे हा प्रकल्प आज वैभव ठरत आहे.

या बरोबरच ईतर सर्वच आघाड्यावर यशस्वीपणे काम करणं सोपं नाही.पण हे सर्व आण्णा तुम्ही तुमच्यातील अंगभूत गुणांनी साध्य केले आहे.आज वाढदिवसानिमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो व एक दिवस आपण जालना शहराचं नेतृत्व करताना आम्हाला पाहावयास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पुनश्च आपणास लाख लाख शुभेच्छा!
शुभेच्छुक-तुकाराम राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड,छबुराव राठोड,नितीन पवार,रमेश पवार,गोरख जाधव,संजय रंधवे,सचिन चव्हाण,भिमराव चव्हाण,सुभाष चव्हाण,शामराव पवार व भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment