(सूर्या मराठी न्युज)
सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यात्रा कोरोना या वैश्विक महामारी मुळे रद्द असल्यामुळे मध्यरात्री काढली डोक्यावर छोट्या रथाची मिरवणूक ; अन् सोनाळा पोलिसांनी केला गुन्हा दाखल…!
अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच दंगा काबू पथक 5ते7 पोलीस उपनिरीक्षक अंदाजे 140 ते 150 पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना मिरवणूक निघाली तरी कशी सोळाना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह???? संग्रामपुर ता प्र
– संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यांची दरवर्षी भव्य यात्रा असते. विदर्भातील नावलौकिक व सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव यंदा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे . तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार यात्रा रद्द व कोणत्याही प्रकारची जमाव न करता 10 लोकांच्या उपस्थित मंदिरास परवानगी दिली होती तसेच रथाची गावातुन मिरवणूक काढण्यास परवानगी नसतांना सोनाळा गावातील काही भक्तांनी मोठ्या रथाची ओढून मिरवणूक न काढता प्रशासनाची कोणतीही परवानगी नसतांना मोठ्या प्रमाणात जमाव करून डोक्यावर लहान रथ ची प्रतिकृती घेवून रात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान गावातुन मिरवणूक काढली त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याने भक्तावर गुन्हा दाखल केले.सोनाळा पोलीस तर्फे मंगेश आनंद लेकुरवाळे पोलीस शिपाई बक्कल नंबर392 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोळा पोलिसांनी 27 लोकांवर व30ते 35 अनोळखी लोकांवर कलम 143,188,269,270,116,135,51ब11 भादवि नुसार , गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
प्रकाश पवार हे करीत आहेत