गोंदिया-शैलेश राजनकर
४० वर्षांपासून बोदलबोडीच्या बाघ नदीवर पुलाची प्रतिक्षा : ३ महिन्या पासून बोदलबोडी रस्ता बंद
सालेकसा 11: देशाला स्वातंत्र्य मिळून आजघडीला ७३ वर्ष झाले़ मात्र, आजही अनेक गाव हे विकासापासून कोसो दूर आहेत़ काही गावात तर अद्याप रस्तेच नसल्याचे चित्र आहे़ तर काही गावांमध्ये नेमका विकास म्हणजे काय असा प्रश्न आजही कायम आहे़ सद्या असाच काहीसा प्रश्न सालेकसा तालुक्यातील नागरिकांना पडला आहे़ तालुक्यातील बोदलबोडी गावाला लागूनच बोदलबोडी ते भजेपार मार्गावर वाघ नादी वाहत असून या नदीवर अद्यापही पुलाची निर्मीती करण्यात आली नाही़ मागणील ४० वर्षांपासून येथील नागरिक पुलाची मागणी करीत असले तरी आतापर्यंत त्यांच्या पदरी केवळ आश्वासनच मिळाले आहे़ विशेष म्हणजे सद्यास्थितीत पुलाअभावी मागील ३ महिण्यांपासून हा मार्ग बंद पडला आहे़ असे असताना या गावाकडे एकाही लोकप्रतिनीधीचे लक्ष न जाणे ही त्या लोकप्रतिनीधीच्या कार्यशैलीचा परिचय देणारी बाब आहे़
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून सालेकसा तालुका आहे़ आदिवासी बहूल व नक्षल दृष्ट्या अतिसंवेदनशील तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे़ आजही तालुक्यात नक्षल कारवाया घडत असतात अशात शासनाकडून नक्षलग्रस्त भागाचा विकास व्हावा यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च होत असताना एखाद्या नदीवरील पुलासाठी ४० वर्षांपासून प्रतिक्षा करावी लागणे हे पचणी पडण्यासारखे नाही़ देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात मोडत असलेला हा तालुका गडचिरोली /चिमूर लोकसभा क्षेत्रा येत असल्याने राजकीय अनास्था या तालुक्याच्या नशिबीच आल्याचे चित्र आहे़ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कितीतरी खासदार, आमदार लोकप्रतिनीधी या गावात निवडणूकीच्या काळात आले अन् आश्वासन देऊन पुन्हा न येण्याची शपथच घेऊन गेल्याची प्रचिती या परिसरात येताना येते, विशेषत: बोदलबोडी येथील पुलाच्या मागणीवरून तरी असेच म्हणता येईल़ तालुका मुख्यालयापासून अवघा काही अंतरावर बोदलबोडी हे गाव असून याच मार्गावर गिरोला, दरबडा, धानोली, गांधीटोला, साकरीटोला, दागुटोला, नदीटोला, गोविंदपुर, माताटोला, पानगाव आदी गावे येत असून तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी हा मार्ग येथील नागरिकांना सोयीस्कर आहे़ मात्र, पुलाअभावी या मार्गावरून पवासळ्याच्या दिवसात विशेष म्हणजे ३ ते ४ महिने वाहतूक बंद असते़ परिणामी या मार्गावरील नागरिकांना तालुका मुख्यालयी जाण्यासाठी १० ते १२ किमीचा अधिकचा प्रवास करावा लागत आहे़ त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाते़ त्यातच आता मागील ३ महिण्यांपासून हा मार्ग बंदावस्थेत असून नागरिकांना चांगलीच कसरत करावी लगात आहे़ तेव्हा लोकप्रतिनीधी, शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाची निर्मीती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली अहे आहे़
बोदलबोडीवासी आरोग्य सेवेपासून वंचित-
बोदलबोडी येथील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी जवळच्या सातगाव येथे प्राथमीक आरोग्य केंद्र देण्यात आले आहे़ मात्र, नदीवर पुल नसल्याने व सद्यास्थितीत मागील चार महिण्यांपासून मार्गावर पाणी साचून असल्याने येथील नागरिकांना हक्काची आरोग्य सेवा घेता येत नाही़ त्यातच आता कोरोना महामारीचा प्रकोप येथील नागरिकांच्या काळजीत भर टाकणारा आहे.
भूलथापांचे भूमीपुजन
मागच्या वर्षी एका लोकप्रतिनीधीच्या नेतृत्वात या पुलाच्या निर्मीतीसाठी भूमीपुजन करण्यात आले होते़ तेव्हा येथील नागरिकांमध्ये चांगलेच आनंद निर्माण झाले होते़ तर वर्षापासूनची पुलाची प्रतिक्षा संपणार अशी आशा नागरिकांमध्ये पल्लवित झाली होत़ मात्र, सदर पुलाच्या बांधकामाला अद्याप प्रशासकिय मान्यताच मिळाली नसल्याचे कळले़ तेव्हा प्रशासकिय मान्यता नसताना पुलाच्या बांधकामाचे भुमीपुजन कसे झाले हा प्रश्न भेडसात असून ते भुमीपुजन केवळ भुलथापाचे होते काय असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत़
कोरोनामुळे अडकला काम-
बोदलबोडी ते भजेपार बाघ नदी पुलाचा टेंडर झालेला नाही़ कोरोना संक्रमणाचे काळ आल्याने व सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली असल्याने संबंधित फाईल मंत्रालयातच पडून आहेत़ तेव्हा लोकप्रतिनीधींनी लक्ष दिल्यास लवकरच कामाला सुरुवात होऊ शकते टी. आर. तुरकर उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया