मुंबईतील होमगार्ड सैनिकांचे राज्यव्यापी साखळी उपोषणात तालुक्यातील होमगार्ड सहभागी

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

होमगार्ड सैनिक आपल्या मागण्यांसाठी डॉक्टर प्रतापराव मोहीते पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 21 ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानावर साखळी उपोषण करीत आहेत त्यात आपला सहभाग नोंदवा म्हणून तालुक्यातील होमगार्डानी मुंबईतील आंदोलनाला भेट दिली व आंदोलनात सहभागी झाले.

21 ऑगस्ट पासून मुंबईत सुरू असलेल्या होमगार्ड सैनिकांच्या राज्यव्यापी साखळी उपोषण व धरणे आक्रोश आंदोलना द्वारे राज्य शासनाला मागण्या मागित असून एकूण वीस मागण्या त्यांच्या आहेत त्यातील प्रामुख्याने काही मागण्या तरी पूर्ण कराव्यात असा त्यांचा आग्रह आहे त्यातील प्रमुख मागणी केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या 17 जानेवारी 1984 च्या आदेशाचे अंमलबजावणी करून होमगार्डांना 365 दिवस नियमित काम देण्यात यावे

, मुंबई होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर तीन वर्षांनी होणाऱ्या पुनर्न नोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, पोलीस विभाग प्रमाणेच राज्याने दर आर्थिक वर्षी त्यांच्या बजेट क्षेत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजेटचे व्यवस्था निर्माण करावे तसेच प्रतिवर्ष महागाई दरानुसार होमगार्ड विभागाला महागाई भत्ता उपलब्ध करण्याचे विधान तयार करण्यात यावे,

होमगार्ड यांना साप्ताहिक परेडचा भत्ता उजळणी प्रशिक्षण भत्ता व तसेच आगामी काळा मध्ये येणारे सर्व प्रशिक्षण भत्ता व त्याचप्रमाणे शासनाचे प्यारा मिलिटरी फोर्स ला लावून दिलेले सहा महिन्याचे अतिदक्ष प्रशिक्षण शिवार कर्तव्य भत्ता चे दर मानधनाच्या समप्रमाणानुसार देयक असावा,

होमगार्ड संघटना ही केंद्र सरकार अथवा राज्य सरकार कोणीही एकाच्या नियंत्रणाखाली असावी,
होमगार्ड सैनिकांना वेतन्य रजा तसेच मेडिकल लिव्ह इत्यादी मंडळाला मिळणाऱ्या सर्व सुट्ट्यांचे

प्यारामिलिटरी फोर्स अॅक्ट नुसार तरतूद करावी,
होमगार्ड सैनिकांच्या गणवेश सुसज्जतेबाबत पी कॅप स्टील चामडी बेल्ट जुने अर्म बॅच MHG किंवा गृहरक्षक दल असे शोल्डर बॅच होमगार्डची अतिदक्ष फोर्स निर्माण करून त्यांना खाकी वर्दी व्यतिरिक्त कमांडो ड्रेस कोड देण्यात यावे

,अशा महत्वपूर्ण मागण्यांसाठी होमगार्ड सैनिक यांचे 10 दिवसांचे साखळी उपोषण व भरणे आक्रोश आंदोलन मुंबई आझाद मैदानावर सुरू असुन सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व स्तरातून होमगार्ड पोहचत आहेत,

चौकट
जिल्ह्यातील होमगार्ड सैनिकांचे म्हणणे आहे की आज पर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी होमगार्ड यांच्या समस्या कोणत्याही अधिवेशनात मांडल्या नाहीत ही खेदाची बाब आहे तरी येत्या हिवाळी अधिवेशनात तरी होमगार्ड यांच्या समस्या जिल्ह्यातील नेते मांडतील अशी उमेद जिल्ह्यातील होमगार्ड सैनिकांना आहे

Leave a Comment