Home गोंदिया मुख्यमंत्री ठाकरे,खा.प्रफुल पटेल आज भंडारा येथे

मुख्यमंत्री ठाकरे,खा.प्रफुल पटेल आज भंडारा येथे

278
0

 

गोंदिया शैलेश राजनकर

भंडारा,दि.10 : भंडारा जिल्हा रुग्णालयात १0 नवजात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मरण पावल्याची मनाला पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल हे रविवारी दुपारी १२ वाजता दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत. तसेच नवजात बालके गमावलेल्या पालकांचीही ते भेट घेणार आहेत. अतिरिक्त सचिव आशिष सिंग, परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील या दौर्‍यात असणार आहेत.

Previous articleहिवरा आश्रम – चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा येथे ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघातात एक गंभीर जखमी.
Next articleनिरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here