मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे २ बैल जोडया चोरीला , भुरटया चोरांचा लाखपुरीत धुमाकुळ …

 

२ बैल जोडया चोरीला बैलाची किमंत दिड लाख रुपये…
पोलिस प्रशासन देणार का लक्ष ……..

अतिशकुमार वानखडे(अकोला)

लाखपुरी : – , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील दि. १०-११-२०२० रोजी पहाटे सकाळी ५ च्या सुमारास लाखपुरी येथील २ बैल जोड्या चोरीला गेल्या सदर बैल जोड्याची किमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीची असुन यामध्ये वासुदेव दौलत घन याचे बैलाची जोडी लाल रंगाची व रामदास बिसन चव्हाण यांच्या बैलाची जोडी पांढ-या रंगाची सदर २ जोड्या त्यांच्या घरातील कोट्यातुन चोरी गेल्या. चोरट्यांनी सदर बैलाचे घंट्या कोट्यात कापुन टाकल्या त्यामुळे घंट्याचा आवाज न आल्यामुळे वासुदेव दौलत घन व रामदास बिसन हे सकाळी कोट्यात जोडी पाहायला गेले असता त्यांना बैल जोड्या कोट्यात न दिसल्यामुळे त्यांनी सदर घटनेची तक्रार सुभाष चव्हाण व वासुदेव घन यांनी मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे .सदर घटनेचा पुढील तपास मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस स्टेशन करीत आहे. लाखपुरी येथे या आधी सुध्दा गावातील नरेंद्र अवघड व कमलाकर नवघरे याच्या गाई व इतर काही काही लोकांनच्या जनावरांचा अद्याप पत्ता लागला नाही . अज्ञात भुरटया चोरांनवर वेळेवर आळा न घातल्यास त्यांची हिम्मत वाढेल त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी लाखपुरी येथील ग्रामस्थान कडुन होत आहे. सद्या जनावरे चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वत्र गावात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे . पोलिस प्रशासन या भुरटया चोरानवर कधी कारवाई होणार याकडे गावातील ग्रामस्थानचे लक्ष लागले आहे.

माझी जोडी लाल रंगाची होती . सदर माझ्या जोडीची किंमत ९० हजार रुपये आहे. माझी परिस्थीती हालाकीची असुन मी मोलमंजुरी करुन माझा प्रपंच चालवतो दिनांक- ६-११-२०२० रोजी माझ्या कोट्यातुन माझी बैल जोडी नेली . तरी पोलिस प्रशासनाने भुरट्या चोराचा शोध लावुन त्यांना बंदीस्त करावे व प्रशासनाकडुन मला आर्थिक मदत मिळावी हि अपेक्षा….
लाखपुरी येथे या आधी सुध्दा जनावरे चोरीला गेले त्यांचा अद्याप पत्ता लागला नाही . दिनांक – ६ ला साकळी माझे बैल जोडी चोरीला गेले आहे व चोरट्यांनी लाखपुरी मध्ये चोरीचा धुमाकुळ घातला आहे. तरि प्रशासनान चोरट्यांनवर कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावी आथिक मदत मिळवुन द्यावी …
सदर लाखपुरी येथील बरेच गाई, बैल , बक-या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत चालले असुन त्यातच दिनांक ०६-११-२०२० रोजी वासुदेव घन व रामदास चव्हाण याच्या २ जोड्या चोरीला गेल्या यावर पोलिस प्रशासनाकडुन या अज्ञात चोरानंवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment