मु.का.अ श्रीमती भाग्यश्रीताई विसपुते यांनी ऊर्मिला ठाकरे यांना सन्मानपत्र देवून केले अभिनंदन

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा दि.26-09-2023 रोजी जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्रीताई विसपुते मॅडम यांनी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा पंचायत समिती खामगांव येथील प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी ऊर्मिलाताई श्रीकृष्णराव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करून सन्मान पत्र देवून अभिनंदन केले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिवानंद भारसाकळे साहेब, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. प्रकाश मुकुंद साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री.उमेश जैन साहेब आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शैक्षणिक बाबींवर चर्चा व शैक्षणिक* *समस्यासंदर्भात उपाय याबाबत सविस्तर चर्चा झाली.

शेवटी उर्मिलाताईंनी मु.का.अ श्रीमती भाग्यश्रीताई विसपुते मॅम यांचेसह उपnमु.का.अ श्री. भारसाकळे साहेब श्री.मुकुंद साहेब,श्री. जैन साहेब आदि मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.

Leave a Comment