अकोला:- आगामी सण उत्सव लक्षात घेता मूर्तिजापूर शहरात सर्वत्र शांतता नांदावी या उद्देशाने मुर्तीजापुर शहर पोलिसांच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवकर यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन काढण्यात आले.
आगामी सण उत्सवानिमित्त सर्वांनी प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले. पुढे श्रीराम नवमी जन्मोत्सव असून, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांनी केले आहे. शहरातून निघालेला या पथसंचलनात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
———————–
मूर्तिजापूर वरून कॅमेरामन शाम वाळस्कर सह प्रतिनिधी प्रतिक कुऱ्हेकर सूर्या न्युज मराठी अकोला.