सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी
औरंंगाबाद : राज्यात गेल्या सहा महिन्यापासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्यातील सर्व शिक्षण संस्था व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांवर उपासमारी व बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पदवीधर व शिक्षक आमदार यांनी शिक्षण संस्था व शिक्षक वर्गाला कोणतीच मदत व साधी विचारपूस सुधा केली नाही. यासाठी आमच्या हक्कासाठी व अन्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) आगामी येऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर निवडणूक लढविण्याची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी केली.
पूढे ते म्हणाले कि, कोरोना महामारीच्या काळात सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्याच प्रमाणे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे संसार उघड्यावार आले. दरम्यान सरकारने कोणतीही शैक्षणिक सुविधा न पुरवता ऑनलाईन शिक्षणाच्या पोकळ गप्पा मारल्या,त्यात एकही अनुदानित किंवा सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना शिकविलेच नाही. परंतू सर्व इंग्रजी माध्यमातील शाळांनी ऑनलाईन शिकवणी शिकवीली असुन ती सुरू आहे. दरम्यान इंग्रजी शाळाच्या विविध समस्या,अडचणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सोडविण्यासाठी पदवीधर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे तायडे यांनी सांगितले. या निवडणूकीसाठी शैक्षणिक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा जवळपास १८ संघटनानी पांठिबा दिला आहे. तर मराठवाड्यातील विद्यार्थी पालक, इंग्रजी, मराठी, उर्दू शाळाच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षक व बी.एड संघटनी वर्षभरात ७० हजार पदवीधर मतदारांची नोंदणी झाली असून राज्यातील चारही विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका मेस्टा लढविणार असल्याचे तायडे म्हणाले.