Home बुलढाणा मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

427
0

 

मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा नवजीवन विद्यालय अंजनी बुद्रुक या ठिकाणी पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानदेव बळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर तालुका अध्यक्ष राजेश मगर अमरावती विभाग संपर्कप्रमुख शिवशंकर मगर त्याचप्रमाणे माझी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आल्हाट साहेब सरपंच गजानन टोणपे वसंतराव नाईक विद्यालयाचे माननीय आखरे सर नवजीवन विद्यालयाचे ठाकरे सर पाटील सर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष लाड सतीश खडसे डॉक्टर अशोक नागोलकर प्रदीप सरोदे किरण परिसकरहे हजर होते मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो व आकर्षक प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण भारतभर महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंताचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री ज्ञानदेव बळी यांनी विद्याधन हे सर्वात मोठे धन आहे या धरणाची शिदोरी घेऊन आपण फार मोठे व्हा व भारत मातेची सेवा करा असे सांगितले महात्मा फुले ब्रिगेडचे मेहकर तालुका अध्यक्ष राजेश मगर यांनी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना महात्मा फुले ब्रिगेड सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक महात्मा फुले ब्रिगेडचे कार्यकर्ते गणेश अल्हाट विशाल लाड हनुमान पायघन गोपाल अल्हाट शिवम ढोले नागेश भोने व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचलन शिवम ढोले यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश लाड यांनी केले

Previous articleअनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अन्नदान करत केले पितृपूजन
Next articleनव्या दिशा संस्थेअंतर्गत कोरोना जनजागृती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here