दिपक देशमुख-मेहकर तालुका
मेहकर तालुक्यातील जवळपास खरीप हंगामातील पेरणी होऊन एक महिना संपत आला आहे मात्र अद्यापही पाऊस थांबवण्याचे नाव हि घेत नाही जवळपास तुर आणि सोयाबीन खुप प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे शेतात पाणी साचले आहे त्यामुळे शेतकरी हा आपल्या दोन ते तीन बार पेरणी करुनही शेत काळेच आहे अती पावसा मूळे सोयाबीनचे बि जमिनीत सडले आहे आणि अद्यापही कोणी कुषी अधिकारी तलाठी किंवा किंवा विधायक फिरकले नाही आताच्या पक्षात शिंदे गटात जाण्यासाठी विधायक आपला मतदार संघाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना सध्या शेतकरी यांच्या पिकाकडे लक्ष केंद्रित झाले नाही सध्या जो तो आपली खुर्ची आणि सत्ता टिकवण्यासाठी आपली धुरा सांभाळत आहेत मात्र एकिकडे शेतकरी हा आपल्या मशागतीसाठी लागणार खर्च बॅंकेचे कर्ज काढून शेती करत आहे मात्र शेतकरी यांच्या कडे कोणतीही शासकिय अधिकारी किंवा यंत्रणा पोहचली नाही जो तो पदासाठी शिंदे गटात जात आहे त्यामुळे शेतकरी यांचा वाली सध्या कोण नाही त्यामुळे मतदार राजा आणि शेतकरी यांनी जागुत व्हावे असा सल्ला सध्या ग्रामीण भागातील नवयुवक करीत आहे