मेहकर येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मेहकर येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले !
तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी त्यांनी सांगितले की या भारताचे खरे राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, जोतीराव गोविंदराव फुले ( २८ नोव्हेंबर १८९०) रोजी पुण्यतिथी आहे, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते ,,महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची, समाधी शोधून,पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले होते, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली,,आज २८ नोव्हेंबर रोजी त्यांचे पुण्यतिथी आहे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम..!
यावेळी !
तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,मा.सुभाष भाऊ बैलके,अनिल भाऊ देबाजे,कुणाल भाऊ माने,कैलास भाऊ दुगाने,अख्तर भाई कुरेशी,सचिन बनचरे,व समस्त मित्र परिवार ,,,आदी उपस्थित होते,

Leave a Comment