मोताळा तालुक्यातील वनहक्क दावेदारांवर वन व महसूल प्रशासनाकडून अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी- के जी शाह

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा :- तालुक्यातील उबाळखेड , माळेगाव , मोहेगाव , रोहिनखेड , राहेरा , लोणघाट , दाभा , कोऱ्हाळा , खडकी , गुलभेली , खैरखेड , कोथळी , तरोडा , वारुळी इत्यादी गावातील वनजमिनिवर अतिक्रमण केलेल्या वनहक्क कायद्यानुसार दावे दाखल झालेल्या वनहक्क दावेदारांचे एकूण 262 वनहक्क दावे मा. उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय समिती यांनी दि. 29/10/2020 रोजी मोताळा तहसील कार्यालयात ग्रामस्तरीय वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सदर दाव्यातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत सदरचे 262 वनहक्क दावे मोताळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार महसूल यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत
सदर दावे महाराष्ट्र शासनाच्या दि 18/05/2018 रोजीच्या परिपत्रकानुसार तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 , नियम 2008 , सुधारित नियम 2012 अंमलबजावनीचे प्राधिकार व कार्यपद्धती नुसार संबंधित दाव्याची पडताळणी करण्याबाबत व वनहक्क कायद्यातील कलम 12 क (1) प्रमाणे वनहक्क समितीच्या व दावेदऱ्यांच्या उपस्थितीत वन व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ताब्यात असलेल्या अतिक्रमण शेतजमिनीच्या स्थळ निरीक्षण व ताब्यात असलेल्या जमिनीचे पंचनामे तसेच मागणीचे क्षेत्र निश्चित करणारा नकाशा , वनविभागाचा नमुना-अ इत्यादी वनहक्क दाव्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांनी माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर यांना याआधीच पत्र क्र . 1822/2020 दि. 22/05/2020 नुसार दिले आहे .
असे असतांना , मोताळा तालुक्यातील वनहक्क दावेदाऱ्यांच्या संदर्भात पंचनामे व स्थळ निरीक्षण अहवाल तयार करतांना तसेच दि 11 मे 2018 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे वनमित्र मोहीम राबविताना वनहक्क दावेदारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी याबाबत आज दि 3/11/2020 रोजी मा तहसीलदार मोताळा यांना भूमिहक्क परिषदेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदनाच्या प्रती मा. आयुक्त अमरावती , मा. जिल्हाधिकारी बुलडाणा , मा. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना सादर करण्यात आले आहे .
निवेदन सादर करतांना शिष्ट मंडळामध्ये संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड , मोताळा तालुकाध्यक्ष भास्कर धुरंधर , संघटनेचे महासचिव रामकृष्ण मोरे यांच्यासह शिवदास घोती , उत्तम मोरे , तेजराव चव्हाण , आत्माराम फुलमाळी , पुनमचंद डांगे , संतोष चव्हाण , अनुसया वाकोडे उपस्थित होते.

Leave a Comment