मोहराळा येथे अज्ञात व्याक्ती कडून पुतळ्याची विटंबणा पोलीसात गुन्हा दाखल गावात तणाव पुर्ण शांतता

0
287

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मोहराळा येथे महापुरूष यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावातील बसस्टॅन्ड चौकात पोलीस बंदोबस्त तावण्यात आला आहे .

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला असून याच्या बाजूला दोन सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आलेले आहेत. काल रात्री कुणी तरी डबे फेकल्याने शॉर्ट सर्कीट होऊन लाईट गेलेली होती. आज सायंकाळी लाईट आली. आज दिवसभर पाऊस असल्याने कुणाचे पुतळ्याकडे लक्ष गेले नाही.

दरम्यान, सायंकाळी अनिल केशव अडकमोल हे पुतळ्याजवळचे सीसीटिव्ही कॅमेरे सुरू आहे की नाही ? हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना कुणी तरी अज्ञात समाजकंटकाने पुतळ्याच्या दिशेने दोन दगड भिरकावल्याचे दिसून आले.

यामुळे पुतळ्याला दोन ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच समाजबांधवांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी मोहराळा येथे दाखल झाले. तर, समाजबांधवांनी यावल पोलीस स्थानकात धडक देऊन या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.

या संदर्भात यावल पोलीस स्थानकात अनिल केशव अडकमोल ( वय ५२) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गावातील वातावरण नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे व पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर यांनी मोहराळा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे.

आज सकाळी निळे निशान या सामाजीक संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी मोहराळा गावाला भेट दिली व सर्व समाज बांधवांना कोणताही कायद्या हातात न घेता शांततेच्या मार्गाने न्याय मिळवण्याबद्दल मार्गदर्शन व सुचना दिल्यात , यावेळी मोहराळा ग्रामपंचायतच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मोठया संख्येत समाजबांधव उपस्थित होते . दरम्यान आनंद बाविस्कर यांच्या सोबत निळे निशान संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास तायडे , युवकचे सतिष अडकमोल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here