Home बुलढाणा मोहाडी येथील सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !अमरावती येथील विद्यालयात मिळणार प्रवेश...

मोहाडी येथील सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !अमरावती येथील विद्यालयात मिळणार प्रवेश !

434
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक मा.प्रकाश रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक इंगोले सर व मोरे सर यांच्या अथक परिश्रमाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शाळेचं नाव कमावले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये वर्ग पाचवा एकूण अठरा विद्यार्थी पैकी सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे ! त्यांना पुढिल शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पुढील सर्व शिक्षण मोफत मध्ये विद्यानिकेतन विद्यालय अमरावती येथे या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड झाली यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे यश राजेंद्र इंगळे,प्रज्वल जगाराव इंगळे, संघर्ष अमोल इंगळे, ऋषिकेश सुनील शिराळे, प्रशांत संजय रिंढे,अजय संतोष झीने,कुणाल विजय जाधव यां मुलांनी ग्रामीण भागातील असलेल्या मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव उच्च पातळीवर नेले आहे ।या यशामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे !

Previous articleउंद्री येथे सरपंच प्रदीप अंभोरे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे अनावरण !
Next articleBREAKING NEWS  सौन्दड ग्राम पंचायत कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here