यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथील आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयातील लेखापाल याला भोजन ठेकेदाराकडुन २० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असुन , या कारवाई मुळे यावल तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे .
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की , यावल येथे आदीवासी प्रकल्प विकास विभागाचे जिल्हा कार्यालय असुन , या कार्यालया अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात , यात शासनाच्या वतीने आदीवासी समाज बांधवांच्या पाल्यांना मोफत शिक्षण व भोजनाची सोय केली जाते .
यात भोजनासाठीची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात येत असली तरी याबाबतचा ठेका दिला जातो ,
या संदर्भातील तक्रारदाराची पत्नी ही चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन सन्२०२१-२०२२या वर्षासाठी भोजन पुरवठा करण्यात आला होता . त्या ठेक्या पोटी ७३ लाखांचे बिल मंजुर झाले मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजुर बिलाचा अर्धा टवके अर्थात३६ हजार५ooरूपयांच्या लाचेची मागणी यावलच्या आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयातील लेखापाल या पदावर कार्यरत असलेले रविन्द्र बी जोशी याने केली .
या प्रकरणात तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले . दरम्यान ठेकेदाराने लाचलुचपत विभागाक्डे तक्रार दिली . त्यानुसार शुक्रवार दिनांक २द मे रोजी दुपारच्या सुमारास २० हजार रूपयांची लाच घेतांना जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचुन पकडले आहे .
याबाबत जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या वतीने पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत सुरू होते .