यावल येथील पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले तिन ग्रामसेवकांना आज महसुल प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदा उत्कृष्ठ ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )म्हणुन प्रशिस्तीपत्र गौरविण्यात आले आहे . आज दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन निवडणुक आयोगाच्या वतीने राबविण्यात मतदार नोंदणी अभीयांनात मालोद , मोहराळे ,बोराळे या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले राजु अन्वर तडवी , चितोडा आणी चिखली येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या रूपाली तळेले आणी बोरखेडा येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले लक्ष्मीकांत उर्फ हितु महाजन यांना यंदाचे उत्कृष्ठ बिएलओ म्हणुन फैजपुर येथील प्रांत कार्यालयातील सभागृहात विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते आणी यावलचे तहसीलदार महेश पवार , यावल येथील निवडणुक शाखेतील नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ठ ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )प्रशस्तीती पत्र देवुन गौरविण्यात आले आहे .