यावल चोपडा मार्गावर मालट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यु पोलीसात गुन्हा दाखल

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल चोपडा राज्य मार्गावरील रस्त्यावर वाहनचालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात एका मृत्यु झाला असुन , पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार दिनांक ९नॉव्हेबरच्या रात्री ९ वाजता यावल चोपडा मार्गा वरील केसरबाग हॉटेल जवळ ट्रक वाहन चालक राजु गोविंदसिंग ( गब्बर भाई ) राहणार इधलपुर तालुका मणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची १० चाकी मालट्रक वाहन क्रमांक आरजे ११जीए ७३८०हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मोबाईल बोलत भारद्याव वेगाने वाहन चालवित असतांना , चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने मालट्रक मधुन निघुन उडी मारीत असतांना रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या एका झाडावर मालट्रक आदळुन झालेल्या भिषण अपघातात स्वत गंभीर जख्मी होवुन मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत ठरला आहे . याबाबत महावीर कन्हैलाल राजपुत वय २८वर्ष राहणार ईधलपुर तालुका माणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वाहनचालक राजु गोविंदसिंग यांच्या विरूद्ध भादवी कलम३o४ ( अ ) २८९ , ३३७, ३३८ कलमासह मोटर वाहन कायदा नियम १८४ ( सी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या अपघाताचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Leave a Comment