Home Breaking News यावल चोपडा रोडवर वेगाने जाणाऱ्या अयसर वाहनाने जाणाऱ्या पादचाऱ्यास उडविले पोलीसात गुन्हा...

यावल चोपडा रोडवर वेगाने जाणाऱ्या अयसर वाहनाने जाणाऱ्या पादचाऱ्यास उडविले पोलीसात गुन्हा दाखल

522
0

 

यावल प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल चोपडा मार्गावरील डॉ झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल फाटया जवळ एका मोटर वाहनाने धडक देवुन झालेल्या अपघात एक व्याक्ती गंभीर जखमी झाला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी आज दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ८ .३० वाजेच्या सुमारास यावल चोपडा रोडवर चोपडयाकडे जाणाऱ्या अयसर ट्रक वाहन क्रमांक एचआर ७३ए६३१९यावरील वाहनचालक याने भरधाव वेगाने ट्रक चालवुन रस्त्यावर साईटने जाणारे अब्दुल हमीद शेख मोहम्मद वय ७० वर्ष राहणार डांगपुरा, यावल यांना जोरदार धडक दिल्याने ट्रकचालक हा पोलीसांना अपघाताची सुचना न देता घटनास्थळावरून पळुन गेला , घटनास्थळी उपस्थित नागरीकांनी समय सुचकता बाळगुन तात्काळ जख्मी अब्दुल हमीद शेख मोहम्मद उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात पाठविले असुन , याबाबत जख्मी सोबत असलेले शेख मुस्ताक शेख हसैन यांनी पोलीसात तक्रार दिल्याने वाहनचालका विरूद्ध भाग ५ गुरन५० / २०२१ भादवी कलम२७९ , ३३८ , मोटर वाहन कायदा कलम१८४, १३४ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, घटनेचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण हे करीत आहे . दरम्यान उशीरा मिळालेल्या माहीतीनुसार अडावद पोलीसांच्या मदतीने अपघातास कारणीभुत वाहनचालकास ट्रकासह पकडण्यात आले आहे .

Previous articleकिनगाव येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा खरेदी करून व्यापाऱ्याकडुन लाखो रूपयात फसवणुक पोलीसात गुन्हा दाखल
Next articleशेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा-आमदार राजेश एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here