Home Breaking News यावल तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी चौथ्या दिवसी४०३ उमेदवारी अर्ज दाखल

यावल तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी चौथ्या दिवसी४०३ उमेदवारी अर्ज दाखल

599
0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्राम पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग आले असुन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवसी४०३ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे . यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीचा सार्वत्रीक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी यासाठी १ लाख४० हजाराहुन अधिक मतदार हे ४६९ नवनिंवाचित उमेदवारांना निवडुन देण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील याकरीता यावल येथील तहसील कार्यालयात आज सकाळ पासुनच आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या गर्दीमुळे यावल तहसीलची जुने कार्यालयापासुन नवीन प्रशासकीय इमारतीवरील मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते . दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथ्या दिवसी किनगाव ग्राम पंचायत साठी २३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज अट्रावल ग्रामपंचायती करिता२o अर्ज , हिंगोणे ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज , मोहराळे करीता २२ अर्ज , भालोद करीता २० उमेदवारी अर्ज , डोंगर कठोरा ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज , कोरपावली साठी १८ उमेदवारी अर्ज , महेलखेडी ग्रामपंचायतसाठी १५ अर्ज , सावखेडा सिम ग्रामपंचायत साठी १४ अर्ज आणी शिरसाड १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन , या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन , दरम्यान बोरावल ग्राम पंचायतीसह भालशिव ग्राम पंचायत वढोदे प्र . यावल , वढोदे प्रगणे सावदा , आडगाव आणी चिंचोली या६ गावातुन एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत उद्या दिनांक ३० डिसेंबर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस असुन , दिनांक ३१ डिसेंबर रोजी छाननी व दिनांक ४ जानेवारी २०२१ ला उमेदवारांचे अर्ज माघार व चिन्ह वाटप होणार आहे .

Previous articleशिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह 9 जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleअनुसूचित जाती, ओ बी सी प्रवर्ग,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन) यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here