यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या ११ प्रभागासाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली अमुन, यात१२ महीला व ११ पुरूष उमेदवारांचा समावेश करण्यात आले आहे . यावल येथील नगर परिषदच्या होवु घातलेल्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत ची बैठक यावल नगर परिषदच्या सभागृहात आज दिनांक १३ जुन रोजी सकाळी ११ वाजता यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांच्या उपस्थिती पडली, यात यावल नगर परिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली असुन , यात प्रभाग क्रमाक१साठी सर्वसाधारण महीला व पुरूष ,प्रभाग क्रमांक२साठी अनु . जातीची महीला , प्रभाग क्रमांक३साठी अनुसुचित जातीची महीला उमेदवारासाठी राखीव , प्रभाग क्रमांक४साठी प्रभाग क्रमांक६साठी सर्वसाधारण महीला व पुरूष , प्रभाग क्रमांक७साठी महिला व पुरूष , प्रभाग क्रमांक८साठी सर्वसाधारण महीला व पुरुष , प्रभाग क्रमांक९साठी सर्वसाधारण महीला व पुरूष , प्रभाग क्रमांक१oसाठी सर्वसाधारण महिला व पुरुष आणी प्रभाग क्रमांक११साठीच्या उमेदवारांचे आरक्षण हे पुरूष अनुसुचित जमातीसाठीचे व सर्वसाधारण महीला आणी पुरूषासाठी जाहीर करण्यात आले आहे . या आरक्षणावर हरकती स्विकारण्याची साठीची शेवटी मुदत १५ जुन असणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या जाहीर करण्यात आले आहे .