यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणा चौकशीच्या लिखित आश्वासनाने सांगता झाली .

 

यावल तालुका( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत अंतर्गत आणी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या चौकशीची मागणी करण्याबाबत वड्री येथील बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणा चौकशीच्या लिखित आश्वासनाने सांगता झाली . यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी वड्री ग्रामपंचायत अंतर्गत त्याच प्रमाणे सावखेडा सिम हिंगोणा जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षेतात झालेली निकृष्ठ कामांची चौकशी तात्काळ चौकशी करण्यात यावी याशिवाय विविध समस्याकडे ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे नाराज झालेले कॉंग्रेसच्या आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी आपले आमरण उपोषणास सुरूवात केली होती. आदीवासी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने संत्पत गावातील समाज बांधवांनी व आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी संघटनेचे जिल्हा रबील तडवी देखील या आमरण उपोषणास आपला जाहीर पाठींबा दिला होता . तत्तपुर्वी दुपारी वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव यांच्या महाराष्ट्र सरपंच परिषदचे अध्यक्ष संदीप सोनवणे , दहिगावचे सरपंच अजय अडकमोल ,कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी आदीवासी बांधवांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले , सायंकाळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे , पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी , आदीवासी नेते एम बी तडवी, अहमद बुऱ्हाण तडवी, वड्रीचे ग्रामसेवक डी एस तिडके, सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्या प्रमुख उपस्थित संपुर्ण मागण्या विषयी उपोषणकर्त यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी चौकशी करून योग्य ते कार्यवाही करण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांना प्रभाकर सोनवणे व शेखर पाटील यांच्या हस्ते ज्युस पाजुन या आमरण उपोषणाची सांगता झाली.

Leave a Comment