यावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर येथे बदली

 

Yaval यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या पाणी टंचाई विभागात गेली तिन दशकापासुन सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी रविन्द्र प्रल्हाद देशमुख यांची जामनेर पंचायत समिती येथे बदली झाली आहे . रविन्द्र प्रल्हाद देशमुख हे मुळ हिवरखेडा तालुका जामनेर येथील रहीवाशी असुन, आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर देशमुख यांनी यावल येथे ७ / ३ / १९९१या वर्षी पंचायत समितीत आपल्या प्रशासकीय सेवाकार्यास सुरुवात केली होती .

यावल पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीटंचाई विभागात त्यांनी सतत ३२ वर्ष तिन दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी उत्कृष्ठरित्या एक उमदा व सर्व प्रिय असे कर्मचारी म्हणुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली . ३० नॉव्हेबर २०२२रोजी त्यांची प्रशासकीय मार्गाने जामनेर येथील पंचायत समितीत बदली झाली असुन , यावल पंचायत समितीत मागील ३२ वर्ष सेवा करीत असतांना त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा एक मोठा कुटुंब निर्माण केले , यावल पंचायत समितीचा पदभार सोडतांना रविन्द्र देशमुख हे अत्यंत भावुक झाले होते .

पण नौकरी आली म्हणजे बदली असते असे सांगुन त्यांनी आपल्या जन्मभुमि असलेल्या जामनेर तालुक्याची आपल्यास सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला . यावेळी त्यांना यावल पंचायत समिती कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी , तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी . व्हि तळेले,हितेन्द्र महाजन , ग्रामसेवक मजीद तडवी , संगणक विभागाचे मिलींद कुरकुरे , जावेद तडवी , अक्षय शिरसाठ , चेतन चौधरी यांच्या आदीनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .

Leave a Comment