यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे
यावल : यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डॉ,मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांनी आज गुरुवार रोजी पदभार स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसापासून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे रिक्त होते
व प्रभारी पदभार एकनाथ चौधरी सहाय्यक गटविकास अधिकारी अंमळनेर यांच्याकडे होता त्यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी पदाचा चार्ज श्री अजय चौधरी सहाय्यक गटविकास अधिकारी भुसावळ यांच्याकडे होता. मात्र आता यावल पंचायत समितीला कायमस्वरूपी गट विकास अधिकारी पदभार आहे
. गुरुवार रोजी डॉ मुंजुश्री गायकवाड यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आगामी काळात पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वेळत पुर्ण होण्यासाठी आपले प्राध्यान्य असे असे प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगीतले.
आहे तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा यावल तालुका ग्रामसेवक युनियन कडून स्वागत सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमातला रुबाब तडवी तालुकाध्यक्ष व पी व्हि तळले सचिव , बीके पारधी उपाध्यक्ष पारोळा सोसायटी हितू महाजन राजू तडवी राजेंद्र महाजन घरकुल प्रोग्रामर मिलिंद कुरकुरे व तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते