यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा पाठलाग करून छेडछाळ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला यावल बसस्थानका आवारातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील काही विद्यार्थ्यांनी ह्या यावल महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. दररोजी यावल बसस्थानक येथून सर्व विद्यार्थीनी मनवेल येथे बसने जाण्यासाठी येत असतात.
बसस्थानक आवारातील पानटपरीजवळ अशोक नानकराम दुधानी रा. भुसावळ हा उभा राहून मनवेल येथील विद्यार्थीनीकडे एक टक पाहत होता. दरम्यान, याकडे विद्यार्थीनींनी दुर्लक्ष केले.तसेच मुली बसमध्ये बसल्यानंतर दुचाकीने बसचा पाठलाग करायला सुरूवात केली.
हा प्रकार गावातील एका विद्यार्थीनीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने गावातील काही तरूणांकडे महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा मोबाईल नंबर देखील मिळविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थीनींनी सकाळी १० वाजता विद्यार्थीनी यावल बसस्थानक येथे आल्यानंतर त्याला जाब विचारला.
जास्त मुलांचा घोळका पाहून त्यांनी सदर मुलींची माफी मागितली व त्यांला नागरीकांच्या मदतीने यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अशोक नानकराम दुधानी रा. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास स .पोलिस उपनिरिक्षक प्रदीप बोरूळे करीत आहे. यापुर्वी देखील या बसस्थानकावरील चहा विक्री करणाऱ्या दुधानी ने याच पध्दतीने मुलींच्या छेडखानी करण्याबाबत च्या तक्रारी आहेत.