यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. व्यासपिठावर अध्यक्ष स्थानी कवि रमजान गुलाब तडवी , प्रमुख पाहुणे प्रा. के के वळवी सर , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र बारेला , जिल्हा सचिव प्रकाश वसावे यांच्या उपस्थित घेण्यात आली. बैठकीत मान्यवरानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेच्या कार्या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नुकताच चार्टर अकाउंटंट (सी.ए.) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत अंजुमन रमजान तडवी हे परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल संघटने तर्फे जिल्हा सल्लागार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा .के के वळवी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची नियुक्ती पुढील प्रमाणे
यावल तालुका अध्यक्षपदी – अब्दुल रशीद तडवी , सचिव -असलम तडवी , उपाध्यक्ष पदी – मुजाहिदा हुसेन तडवी व अठान भुगवाड्या , कार्यध्यक्ष पदी – युनुस अयुब तडवी , सह कार्यध्यक्ष – हकीम तडवी , प्रसिद्धी प्रमुख – सलिम तडवी , सहसचिव - रहीम रशिद तडवी, कोषाध्यक्ष – कादर फत्तु तडवी , संघटक – फुलसिंग किसन बारेला, आरिफ तडवी, सलमा युनुस तडवी व हुसेन नाजिर तडवी , सल्लागार – याकूब आमद तडवी, प्रा. प्रल्हाद पावरा , सुरपाल बारेला व ताराचंद सावसाकडे या सर्वाना मान्यवराच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला संघटनेचे जिल्हा संघटक नवाज जहांगीर तडवी , डॉ. जयेश पाडवी सर , कोषाध्यक्ष प्रदीप बारेला , न्याजूद्दीन तडवी ,
हुसेन रुबाब तडवी , नामदार तडवी , हुसेन नजीर तडवी यांच्यासह इतर सदस्य उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जहाबीर तडवी सर यांनी केले तर आभार रहिम तडवी यांनी मानले.
फोटो – ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची यावलतालुका अध्यक्षपदी – अब्दुल रशीद तडवी