यावल येथे एका विवाहीत तरूणाची राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

 

यावल ( प्रतिनिथी ) विकी वानखेडे

येथील शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तिस वर्षीय विवाहीत तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या बाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , सागर बापु पाटील वय३० वर्ष याने आज दिनांक १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात कुणी नसतांना घरातील छताला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली , मयताची पत्नी शेतात कामास गेली होती तर त्यांचा चार वर्षाचा मुलगा हा शाळेत गेला होता .पत्नी शेतातुन कामावरून घरी आल्यावर घराचे दार उघडवावर सागर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला , पत्नीने आरडाओरड केल्याने त्वरीत परिसरातील राहणाऱ्या तरूणांनी त्याला खाली उतरवुन तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणत असतांना रस्त्यात तो मरण पावला , ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ . सचिन देशमुख यांनी तपासणी केली गळफास घेतल्याने गळयातील स्वास नलीका तुटल्याने मरण पावल्याचे घोषीत केली . मयत तरूण सागर हा यावल येथे बस स्टॅन्डच्या परिसरातील एका बॅटरीच्या दुकानावर कामास होता मी घरून जेवण करून येतो असे तो दुकान मालकास सांगुन गेल्याचे समजते . सागर पाटील व त्याचा मोठा भाऊ पवन पाटील हे दोघ भाऊ लहान असतांनाच आई वडील मरण पावल्याने ते यावल येथील आपल्या मामाकडेच राहात होते . मयत सागर यास एक चार वर्षाचा मुलगा आहे . मयत सागर पाटील याने आत्महत्याका केली हे कारण मात्र स्पष्ठ होवु शकले नाही .

Leave a Comment