यावल येथे हिन्दवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य आभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील हिन्दवी स्वराज्याचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे एतिहासिक शिवराज्यभिषेक दिन एक दिवस महाराजांसाठी म्हणुन शहरातील युवकांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला . यावल शहरातील प्रमुख मार्गाने तरुण युवकांच्या वतीने आज विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रयतेचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक सोहळा मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला , या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवाजी महाराजांची पालखी लहान मुलांचे झांज पथक, डोक्यावर कळस घेवुन महीलांचा सहभाग , शिवकालीन वेशभुयेत लहान मुलांची दिंडी , अष्टप्रधान मंडळ , घोडयावर छत्रपती शिवाजी महाराज , आई जिजाऊ व संभाजी राजे यांच्यासह युवकांचे झांज पथक अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली , या शोभायात्रेचा समारोप शहरातील राजे निबांळकर यांच्या एतिहासीक किल्ल्यावर शिवरायांचा शिवराज्य अभिषेक सोहळा विधीवत पुजा यावलचे आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या हस्ते यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली . या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन कौस्तुभ पाटील व अभिषेक जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन शशीकांत वारूळकर व कैलास माळी यांनी केले. या संपुर्ण शिव राज्य आभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी डॉ . अभय रावते , योगेश वारूळकर , धनंजय बारी , निलेश पाटील , दिपक वारूळकर सौ . प्राची पाठक , अॅड गोविंद बारी , सागर चौधरी , राजेश श्रावगी , मयुर महाजन , लोकेश वाड, पवन खरचे, यशवंत काटकर आदी तरूणांनी परिश्रम घेतले .

Leave a Comment