यावल शहरात विस्तारीत भागात राहणाऱ्या शिक्षकाचा अचानक विहिरीत तोल जावुन पडल्याने दुदैवी मृत्यु

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील विस्तारित भागातील वस्तीत राहणाऱ्या एका विवाहीत शिक्षक तरुणाचा अचानक विहीरीत पडून मरण पावल्याची घटना समोर आली आहे पोलीसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमधील बालाजी सिटी या परिसरात राहणारे व वाघझीरा तालुका यावल येथील आदीवासी आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्य करणारे नितिन लक्ष्मण निंबाळे वय४५ वर्ष हे दिनांक २४ जुलै सोमवार रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे फिरण्यासाठी गेले असता या परिसरातील बालाजी मंदीरा ,जवळ असलेल्या कोरड्या विहीरीच्या ओठयावर बसले असतांना

अचानक त्यांचा तोल जावुन विहीरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. याबाबत मिलींद दिलीप मिस्त्रि वय ४२ वर्ष यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्यु नोंद करण्यात आली असून , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे . मयत शिक्षक नितिन निंबाळे यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले आहेत .

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी ममताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेत.

Leave a Comment