रंकाळा ते नंदवाळ एसटी सेवा

 

तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

नंदवाळ करवीर तालुका १७ ऑक्टोबर कोल्हापूर राधानगरी रोड वाशी ते नंदवाळ अडीच किलोमीटर अंतर आहे.

कोल्हापुरातील नंदवाळ हे गाव आधी नंदापूर मग नंदा ग्राम प्रती पंढरपूर या नावाने प्रसिद्ध आहे. महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक एकादशीला हजारो वारकरी व भाविक विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनाला येतात.व वर्षातील आषाढी एकादशी यात्रेला विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शना साठी चार ते साडेचार लाखांच्यावर भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. माध्यमिक व कॉलेजला विद्यार्थी मुला मुलींना कोल्हापूरला शिक्षणासाठी वाशी फाट्यावर अडीच किलोमीटर पायी चालत जावे लागत होते.

व गावी घरी अडीच किलोमीटर यावे लागत होते.व नंदवाळ गावातील शेतकरी महिला व पुरुष डोक्यावरून चाळीस ते पन्नास किलोचे भाजीपाला व फळे डोक्यावर घेऊन चालत अडीच किलोमीटर वाशी फाटा पर्यंत जात होते. तसेच या गावांमध्ये बांधकाम कामगार 70 ते 80 आहेत.

ह्या बांधकाम कामगारांना आपल्या पोटाची उदा निर्वासाठी कोल्हापूर व भागात कामाला जाण्या, येण्यासाठी अडीच किलोमीटर वाशी फाटा शिवाय पर्याय नव्हता. अशा या गावामध्ये एसटी महामंडळाने एसटी बस सेवा चालू करून इतरांसह गावकरी प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

आगार प्रमुख संभाजीनगर डेपो मॅनेजर, श्री. शिवराज जाधव, वाहतूक नियंत्रक श्री. प्रकाश गायकवाड, एसटी कामगार संघटना सचिव श्री.उत्तम पाटील देवाळेकर, एसटी महिला प्रतिनिधी सौ.अरुणा कोडेंकर, यांचे सहकार्य लाभले.

उपस्थिती – लोक नियुक्त सरपंच श्री.अमर कुंभार साहेब, डेपोडी सरपंच श्री. सचिन कोडेंकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.तानाजी कांबळे, श्री.सुरेश उलपे, श्री.संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.सविता निकम,सौ.उज्वला गुरव,सौ.शारदा पाटील,ग्राम सेवक श्री.उत्तम पाटील, पोलिस पाटील उलपे साहेब व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी प्रवासी होते.

सुर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर

Leave a Comment