रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांना यश..अखेर बुलडाणा जिल्हा महावितरणला 10,500 KL ऑईल मिळाले.. जळालेली विद्युत रोहित्रे बदलून मिळण्याचा मार्ग होणार सुकर..

 

बुलडाणा जिल्ह्यात जळालेली विद्युत रोहित्रे बदलून मिळण्यासाठी लागणारे ऑईल नसल्याने विद्युत रोहित्र बदलुन मिळत नव्हते. यासंदर्भात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी काल (दि.20 नोव्हें) मुंबई येथे राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष / एम.डी. असीम गुप्ता व राज्याचे साहित्य व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता पराग जांभुळकर यांची भेट घेतली होती. बुलडाणा जिल्ह्यासाठी जळालेले विद्युत रोहित्रे बदलून देण्यासाठी लागणाऱ्या ऑईल चा पुरवठा करण्याची आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली होती. ऑईल नसल्या कारणाने जळालेले विद्युत रोहित्र बदलून मिळत नव्हते. शेतात पाणी आहे पण विद्युत रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नव्हते. त्यामुळे शेतकरी परेशान आहेत. रविकांत तुपकरांच्या प्रयत्नाने बुलडाणा जिल्ह्यासाठी 10,500 KL ऑईल मिळाले आहे. त्यामुळे आता जळालेली विद्युत रोहित्रे बदलुन मिळणे अपेक्षित आहे. याउपरही महावितरणने विद्युत रोहित्रे बदलून देण्यासाठी टाळाटाळ केली तर ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलने धडा शिकवला जाईल..! असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

Leave a Comment