Home Breaking News राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवंती सिंगनजुडेचे सुयश

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवंती सिंगनजुडेचे सुयश

249
0

 

गोंदीया-शैलेश राजनकर

लाखनी,दि.27ःनुकतीच राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा यवतमाळ येथे संपन्न झाली.या स्पर्धेत कु.अवंती उमेश सिंगनजुडे हिने तृतीय क्रमांक पटकविल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रम अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2020चे आयोजन केले होते.ही स्पर्धा अ गट इयत्ता 1 ते 4 व ब गट 5 ते 8 अशा दोन गटात घेण्यात आली.या स्पर्धेत महाराष्ट्रातील 550 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या स्पर्धेच्या निकाल सहकार भवन जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्राचे वनमंत्री आदरणीय संजय राठोड यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.या राज्यस्तरीय स्पर्धेत कु.अवंती उमेश सिंगनजुडे ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.मंत्रीमोहदयाच्या हस्ते तिचा व तिच्या पालकांचा रोख रक्कम,सन्मान चिन्ह,ग्रामगीता,पदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ती इयत्ता 8 वित लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल लाखनी येथे शिकत आहे.
यापूर्वी तिने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनेक पारितोषिक पटकविले आहे. त्याचबरोबर ती उत्कृष्ट जलतरणपटू आहे.मागच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चिवला बीच येथील अरबी समुद्रात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती.त्या स्पर्धेत तिने 2 किमी चे अंतर यशस्वीपणे पार केले.
याबद्दल तिचे अभिनंदन लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल चे संचालक संजयराव वनवे ,शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे नागपूर विभागाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे ,राज्य संघटक संजय खेडीकर दिनेश पिकलमुंडे ,विनोद किंदरले,सुभाष चवडे यांनी तिचे अभिनंदन केले आहे

Previous articleलाखनी येथे फटाक्याच्या दुकानाला आग,11 लाखाचे नुकसान
Next articleजामोद ग्रामपंचायत सरपंचावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here