Home Breaking News रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला...

रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

503
0

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

चिखली : रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी
झाल्याची घटना चिखली ते बुलडाणा रोडवरील जैन शोरूम समोर घडली.
याबात पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून काल रात्री १० च्या सुमारास विद्या लक्ष्मण वायाळ (वय ४५ ) व मंगला जाधव ( वय ५० ) दोघीही रा. राऊतवाडी चिखली ह्या रात्री रस्त्याने पायी फिरायला गेल्या असता मेहकर कडून बुलडाण्याकडे पुठ्याचा माल घेऊन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने जाणा-या आयशर ट्रक क्र. ( एम एच १५ ईजी ६८५२ ) ने जोरदार धडक दिल्याने मंगला जाधव ह्या जागीच ठार झाल्या तर विद्या वायाळ ह्या जखमी झाल्या. स्थानीक नागरीकांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली असता चिखली पो. स्टेशनचे पिएस आय चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन सदर आयशर चालक रमेश केशव गोपाळ ( रा. सिरसमणी ता. पारोळा जि. जळगाव वय ३६ ) यास ट्रकसह ताब्यात घेतले.
या घटनेचा प्राथमीक तपास पोलीस ऊप निरीक्षक चव्हाण साहेब यांनी करून पुढील तपास पोलीस ऊपनिरीक्षक किरण खाडे हे करीत आहेत.

Previous articleकोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात
Next articleअकोला जिल्ह्यात आज पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here