रान डुकराच्या हल्यात ५५ बर्षीय इसम जखमी

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

गजानन आईस फॅक्टरी नजीक राहत असलेले राजकुमार माणिक दहीवर पाटील-५५ यांच्यावर दि.२९ सप्टेंबरला सकाळी ८.४५ वा सुमारास रान डुकराने गुड्घ्यावर हल्ला केल्याने गंभीर जखमी केले आहे. दहीवर यांना जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्यावर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

असून पुढील उपचाराकरीता अकोला जिल्हा रुग्णालयात रेफर केल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सकाळच्या सुमारास हा डुकराचा मुक्त संचार आणि झालेल्या हल्लयामुळे भितीदायक वातावरण या परिसरात निर्माण झाले आहे.

शहरी वस्तीलगत डुकराचा संचार झाल्याने व त्याने एका इसमावर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अशीच घटना दि.२० एप्रिल २०२3रोजी सकाळी ११ वा स्थानिक म्हाडा कालनी येथील राहणार जनाबाई रामचंद्र इंगळे वय ६५ ह्या आकोट रोडवरील उन्हाड नाला परिसरात गुरांसाठी चारा आणन्याकरीता गेल्या असता त्यांचेवर अचानक दोन रानडुकरांनी हल्ला केला असता त्यात त्यांचा मृत्यु झाला.

वन विभागाने जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडुन‌ होत आहे.

Leave a Comment