राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना दिव्यांग आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी मनीषा श्रीपाद खेडकर यांची निवड ..

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या दिव्यांग आघाडी च्या विदर्भ अध्यक्ष पदी अकोला येथील समाजसेविका मनीषा श्रीपाद खेडकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दिव्यांग महिला पुरुषांना रेल्वेमधून प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या.

सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे कार्य विस्तार वाढविण्यासाठी समाजसेविका मनीषा श्रीपाद खेडकर यांची दिव्यांग आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड झाल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी या पत्रकात म्हटले आहे

Leave a Comment